Maharashtra Tirth Yatra :- महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमध्ये साठ वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्राची विनामूल्य यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेचे अंमलबजावण्यासाठी जिल्हास्तरीय समितीद्वारे कार्यवाही होणार आहे.Maharashtra Tirth Yatra
तीर्थयात्रेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर
अर्ज कुठे कराल ?
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभासाठी समाज कल्याण विभागाकडे परिपूर्ण प्रस्तावांचा अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची निक्षानुसार छाननी केल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे हवी ?
१) आधार कार्ड
2) निवास पुरावा
3) वय प्रमाणपत्र
4) उत्पन्नाचा दाखला
5) मतदार ओळखपत्र
6) आरोग्य प्रमाणपत्र
7) शिधापत्रिका
8) बँक पासबुक
9) पासपोर्ट साईज फोटो
10) मोबाईल नंबर.
या योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख 139 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून. या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्र पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. जिल्हास्तरीय समितीद्वारे होणार निवड प्रवासाची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी कोर्टाने चेक करून प्राप्त झालेले अर्जाचे उपलब्धतेनुसार द्वारे भक्तांची निवड करण्यात येणार आहे.