या शेतकऱ्यांना मिळणारा 50 हजार रुपये लाभ
गेल्या वर्षभरामध्ये या शेतकऱ्यांना दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांचे खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत. परंतु राज्यातील अनेक शेतकरी आजही या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. यावर सरकारने लवकरात लवकर लाभार्थी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार अशी घोषणा केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात आले होते. याच योजनेअंतर्गत जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत होते त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्सांवर अनुदान लाभ देण्यात आला होता.
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता 50000 दिले जाणार आहेत. पंजाबराव देशमुख व्यवसाय सवलत योजना लाभ घेण्यासाठी आता बहुतांश शेतकरी तीस मार्चपर्यंत त्यांच्या कर्जाचे परतफेड करणार आहेत ही परतफेड दर्शनी की एकाच वर्षात दोनदा कर्ज घेतले होते. Loan waiver
पन्नास हजार रुपये पर्यंत यादी पाण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जाऊन तुमची यादी पाहू शकता. तिथे दिलेल्या यादीमध्ये तुमचे नाव शोधू शकता किंवा जवळच्या महा- ई सेवा केंद्रामध्ये किंवा सीआयसी सेंटरमध्ये जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यादी पाहू शकता. या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही सीसीआय सेंटर मध्ये केवायसी करावी लागणार आहे. तसेच केवायसी केल्यानंतरच तुम्हाला सरकारद्वारे देण्यात येणारा 50 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
2 thoughts on “Loan waiver | महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत, प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा”