Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला अखेर त्याचे गंतव्यस्थान सापडले आहे. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत सुरुवात केली होती. महाराष्ट्रातील 86 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6000 हजार रुपये जमा केले जातील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (नमो किसान योजने) पहिल्या हप्त्याला राज्य सरकारने मान्यता दिली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी सरकारने 1,720 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला 6 हजार रुपये मिळणार आहेत. जानेवारी 2024 पासून पहिल्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. केंद्र आणि राज्य सरकारांना मिळून एकूण 12000 हजार रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत. Beneficiary Status
या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर पंपावर 95% अनुदान मिळत आहे, त्वरित येथून अर्ज करा
नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ताची तारीख
नमो किसान योजना दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांच्या वितरणास सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. पीएएफएमएस प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल. पीएम किसान योजनेप्रमाणे, महाडीबीटी पोर्टलवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्यूल विकसित केले गेले आहे.
दोन्ही योजनांतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळणार
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत प्रति शेतकरी 6000 रुपये जोडणारी ‘नमो शेतकरी महासम्मान निधी’ योजना जून 2023 मध्ये लागू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार, या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीसाठी पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
त्यानंतर यवतमाळ येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेत दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. यावेळी सरकारने एकाच वेळी दोन हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले होते. त्यानंतर आता शेतकरी चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार हाच प्रश्न सर्व शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे.
लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण..! पहा यंदा मिरचीचे भाव पडण्यामागे कारण काय? पहा आजचा लाल मिरचीचा बाजार भाव
पीएफएमएस प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल. PMKISAN योजनेप्रमाणे, MahaIT द्वारे MahaDBT पोर्टलवर ‘नमो शेतकरी महासम्मान निधी’ योजनेचे मॉड्यूल विकसित करण्याचे काम जोरात सुरू आहे. ही तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
नमो शेतकरी महा सन्मान निधी म्हणजे नेमके काय?
- नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
- या योजनेनुसार महाराष्ट्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये जमा करणार आहे.
- दर तीन महिन्यांनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात.
- तसेच आता राज्य सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करणार आहे.
- त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्राकडून 6 हजार आणि महाराष्ट्र सरकारकडून 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होणार आहेत.