Ration card update : रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, मित्रांनो तुम्ही रेशन कार्ड चा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. तुम्ही या अगोदर तुमच्या स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येत असलेले धान्य या महिन्यात न घेतल्यास ते धान्य तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दिले जात होते.
1 मे पासून फक्त याच लोकांना मिळणार मोफत राशन..! शिधापत्रिकांची नवीन यादी जाहीर, यादीत तुमचे नाव पहा
राशन दुकानदारासाठी सूचना :
अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्त्वाचे सूचना परिपत्रकाद्वारे पाठवण्यात आलेले आहे. आपण पाहतो की शिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यात येत आहे. मात्र एकाच वेळी लाभार्थी धन्य घेऊन जात नाही. ज्या कारणाने लाभार्थ्यांना पुढील महिन्यात सात दिवसाच्या आत मध्ये मागील महिन्याचे धान्य मिळत होते. अशी परवानगी दुकानदारांना सरकारने दिली होती.
काळाबाजार रोखण्यासाठी नवीन तरतूद :-
ही नवीन नियम लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या राज्यस्तरी बैठकीमध्ये स्वस्त धान्य वितरणातील त्रुटी बाबत चर्चा करण्यात आली आहे. चालू महिन्यात लाभार्थ्यांची धान्य घेण्याचे राहिले असेल ते धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत मुभा देण्याचे ऐवजी त्याच महिन्यात धान्य घेण्यासाठी सक्ती करण्यात यावी. व सरकारकडून आता तेवढ्याच प्रमाणामध्ये धान्याचा कोठा स्वस्त दुकानदारांना देण्यात येणार आहे. ज्या कारणाने राज्यातील धान्याचा होणारा काळाबाजार रोखता येणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत, प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा
👇
अशाच माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
1 thought on “Ration card update : रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू”