सोयाबीनच्या दरात मोठी वाढ..! आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडतेलाला मागणी वाढली, पहा आजचा सोयाबीन बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीनचे दर वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनच्या गोड तेलाला तेजी आली आहे. त्यामुळे सोयाबीन च्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे दर किती वाढू शकतात व कशामुळे वाढू शकतात याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. केंद्र शासनाच्या किमान हमीभावापेक्षा ही दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावी लागत आहे. मात्र सोयाबीनच्या तेलाच्या दरात मोठी वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दरही वाढणार आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर गोड तेलाला तेजी असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत ग्राहकांना मोठा चटका बसत आहे. गेल्या आठ-दहा दिवसात गोड तेलाच्या दरात वाढ झालेली असून, सरकी व सोयाबीन तेलाचे दर प्रति किलोमागे 5 ते 12 रुपयांनी वाढले आहेत.

रेशन कार्डची नवीन यादी जारी, तुम्हाला गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर मिळेल की नाही ते पहा

सध्याच्या काळात तरी तेल बियाण्याची आवक कमी दिसत असून, मे महिन्यात गोड तेलाच्या दरात आणखीन तेजी पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. असा बाजारपेठेचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर मोठा परिणाम होत असतो. सध्या या बाजारपेठेत गोड तेलाचे दर वाढतच आहेत.

Soyabean Rate Today

त्यात देशांतर्गत तेल बियाचे उत्पादन काहीसे प्रमाणात निसर्गाच्या आपत्तीमुळे कमी झाल्याने त्याचा परिणाम देखील दिसत आहे. आपल्याकडे सरकी,.सोयाबीन, शेंगदाणा त्यालाच उत्पादन घेतले जाते. सध्या सरकी व सूर्यफूल त्याला आणि चांगली उसळी घेतली आहे. शेंगदाणा तेलाचे दर स्थिर असले तरी सर्वाधिक व्यापार असणाऱ्या सरकी तेलाच्या दरात प्रति किलो बारा रुपयाची वाढ झाली आहे.

सोन्याच्या भावात थोड्या प्रमाणात वाढ..! पहा आजची 10 ग्रॅम सोन्याची नवीन किंमत

आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत दोन्ही बाजारपेठेचा अंदाज घेतला तर मे महिन्यामध्ये ही गोड तेलाला तेजी राहण्याचा अंदाज आहे. आपल्याकडे साधारण एप्रिल मे महिन्यात पावसाळ्याची बेगमी म्हणून गोड तेलाची खरेदी करून ठेवले जाते. त्यामुळे या काळात मागणी वाढते. मात्र यंदा याच काळात तेलाला तेजी राहणार असल्याने व्यापाऱ्यांनी तेलाची खरेदी करताना सावधानता बाळगली आहे.

सोयाबीनचे दर वाढण्यास होणार मदत..!

गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. केंद्र शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावे लागले आहे. मात्र गोड तेलाच्या दरात वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दर देखील वाढणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या देशात सोयाबीनचे उत्पादन कमी

ब्राझील व अर्जेंटेनिया मध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र यंदा येथे उत्पादन घटल्याचा परिणाम अंतराष्ट्रीय पातळीवर गोड त्यालाच्या दरावर झाल्याचे तज्ञाचे मत आहे.

शेतकरी बांधव लागा तयारीला ..! या तारखेला होणार मान्सूनचे आगमन पडणार 100% टक्के पाऊस

आजचा सोयाबीन बाजार भाव पहा

सोयाबीन उत्पादनासाठी प्रमुख म्हणून ओळखला जाणारा लातूर बाजार समितीमध्ये दोनशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सोयाबीनचा भाव 4450 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. यवतमाळमध्ये 40 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून त्या ठिकाणी 4250 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. धाराशिव मध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी 4400 रुपये प्रतिक्विंटर एवढा दर मिळाला आहे.

परभणी बाजार समितीमध्ये सात क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी 4350 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 4450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. विदर्भातील प्रमुख बाजारपेठेमध्ये बुलढाणा येथे एक क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, यावरून शेतकरी सोयाबीन विकण्यास तयार नाहीत असे दिसून येत आहे. येथे सोयाबीनचा सर्वसाधारण दर 4300 रुपये प्रति क्विंटल तर बाजारात मिळणाऱ्या कमी भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!