Red Chilli Price: नमस्कार मित्रांनो, मिरचीचा हंगामा संक्रातीपासून सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची रोज 50 टन पेक्षा जास्त आवक होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मिरचीचे भाव कमी झाले असल्यामुळे तिखट मिरचीचा ग्राहकांना गोड दिलासा मिळाला आहे.
एप्रिल महिन्याच्या आखेपर्यंत मिरचीचा हंगामा सुरु राहणार आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये नागरिक मिरची खरेदी करून त्याची चटणी तयार करत असतात. वर्षभर पुरेल एवढा मिरचीचा पुरवठा साठवण करून ठेवला जातो. तयार मिरची पावडर खरेदी करण्याचे प्रमाण देखील यावर्षी वाढले आहे.
मागील वर्षी मिरची व मिरची पावडर चे दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या कशाल मिरचीचा मोठा ठसका बसला होता. मात्र यावर्षीच्या अंगांमध्ये दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व प्रकारच्या मिरचीचे दर नियंत्रणात येत आहेत. यामुळे ग्राहकांनाही समाधान मिळत आहे. मार्च एप्रिल अखेरपर्यंत मिरचीची ग्राहकाकडून मागणी वाढणार असून यावर्षी पीक चांगले असल्यामुळे भाव नियंत्रणात राहण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
येणाऱ्या दिवसात भाव कसे राहतील?
यावर्षी मिरचीचे भाव नियंत्रणात आहेत. मिरचीचा हंगामा चालू झाला असून आवक अशीच वाढत राहिली तर मिरचीचे दर अजून काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. Red Chilli Price
एका व्यक्तीने रोज किती तिखट खावे?
- लाल मिरचीची चटणी हा सर्वांच्या आहारातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे.
- रोज किती चटणी खावी याबदल प्रत्येकाच्या चवीप्रमाणे वेगवेगळे मत आहे.
- काही लोकांना तिखट भाजी आवडते तर काहीना अळणी आवडते, डॉक्टरांच्या मते अति तिखट खाऊ नये, अति तिखट खाल्ल्यामुळे पचनाशी संबंधित आजार वाढण्याची शक्यता असते.
- यामुळे तिखट नेहमी प्रमाणात खावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मिरची आवक कुठून होते?
मुंबईच्या बाजार समितीमध्ये आंध्रप्रदेश मधील गुटूर व तेलंगानातील वारंगळ व खमात येथून मोठ्या प्रमाणात आवक होत असते. त्याचबरोबर इतर शहरातून देखील मिरची आवक होते.
हे पण वाचा:-
1 thought on “लाल मिरची झाली गोड..! मिरचीच्या दरात मोठी घसरण, पहा लाल मिरचीचा बाजार भाव”