पावसाबाबत मोठी बातमी; पुढील 12 तासात या 8 जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert in Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी आजचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या कारण येत्या 12 तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा हाय अलर्ट दिलेला आहे. Rain Alert in Maharashtra

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर राज्यात आजही भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. राज्यामध्ये आठ जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच विदर्भामधील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आज अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच पावसासोबत इथे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पुण्यामध्ये घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून इतर भागांमध्ये हलकी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

तसेच मुंबईमध्ये 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेले आहे. तर पुढील 24 तासांमध्ये मुंबईमध्ये आणखी काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!